कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, आरोपी गजाआड
- क्राईम
- September 6, 2022
- No Comment
हिंजवडी: कत्तल करण्यासाठी जनावरांची टेम्पो मधून वाहतूक करणाऱ्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सुस खिंड येथे करण्यात आली.
सुग्रीव रोहिदास शिंदे (वय 39 रा.हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शंकर उत्तेकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुग्रीव शिंदे याने त्याच्या ताब्यातील एक लाख रुपये किमतीच्या वाहनातून तीन जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक केली याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सुसखिंड येथे टेम्पो अडवला पोलिसांनी आरोपी सुग्रीव याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यामध्ये आरोपी तीन जनावरे कोंडवा येथे कत्तल करण्यासाठी नेत असल्याचे उघडकीस आले.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.