अवैध गुटखा विक्री करणारा सराईत गजाआड, पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या युनिट २ ची कामगिरी
- क्राईम
- September 6, 2022
- No Comment
पिंपरी चिंचवड: शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड पुणे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. ही कारवाई काळभोरनगर येथे करण्यात आली.
सुरेश मुल्लाराम चौधरी (वय 33 रा. काळभोर नगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर फेरीवाला गायकवाड (रा चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस नाईक विपुल जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा व पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री साठवणूक आणि वाहतूक करण्यास बंदी आहे असे असताना आरोपी सुरेश चौधरी यांनी त्याच्या ताब्यात 4 हजार 72 रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा बाळगला. हा गुटखा आरोपी सुरेश चौधरी याला आरोपी गायकवाड याने पुरविला त्यामुळे गायकवाड यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.