बनावट कपड्यांची विक्री करणार्या चौघांवर गुन्हा दाखल
- क्राईम
- September 6, 2022
- No Comment
पिंपरी: कपड्यांच्या नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट कपड्यांची विक्री करणार्या चौघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धेश सुभाष शिर्के (29, व्यवसाय, रा. जोगेश्वरी पुर्व, मुंबई) यांच्या कंपनीचे स्वामीत्व असलेल्या कंपनीचा 1 लाख 13 हजार रूपये किंमतीचे शर्ट, शर्ट, ट्रॅक पँट व जिन्स पँट आदी माल हा पिंपरीमधील दुकानांमध्ये विक्री करण्यात आला.
यामध्ये आरोपी कमलेश यादव, (42) अब्दुल हन्नान मेंहदी मन्सुरी, (40) शफिक शेख (45) (तिघेही रा. काळेवाडी) राजेश लालचंदानी (45 रा. पिंपरी) सर्व आरोपी व्यावसायिक आहेत. आरोपीविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.