दोन एकोणीस वर्षीय तरुणींची एकाच वेळी आत्महत्या,आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
- क्राईमपुणे
- September 15, 2022
- No Comment
हडपसर: पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मैत्रिणी असलेल्या 19 वर्षाच्या दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केली.एकीने राहत्या घरात गळफास घेतला तर एकीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उडी मारली. हडपसरजवळील शेवाळवाडी गावात मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
आकांक्षा औदुंबर गायकवाड आणि सानिका हरिश्चंद्र भागवत अशी आत्महत्या केलेल्या या दोन्हीही मैत्रिणींची नावे आहेत. दोघेही 19 वर्षाच्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीत हा प्रकार घडला.दोघींनीही एकाच वेळी अशा प्रकारे आत्महत्या केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा आणि सानिका दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या.सायंकाळी सातच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सानिकाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना आकांक्षाने पाहिले आणि तिने पाचव्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. ती देखील रुग्णवाहिकेजवळच येऊन पडली. यामध्ये गंभीररीत्या जखमी झाल्याने तिचा देखील मृत्यू झाला. या दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.