रस्त्यावर थांबून नागरिकांना अश्लील हातवारे केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल
- क्राईम
- November 17, 2022
- No Comment
तळेगाव: तळेगाव खिंडीत थांबून नागरिकांना अश्लील हातवारे करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तळेगाव खिंडीत थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हातवारे करीत होत्या.
वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांचे कृत्य सुरु असल्याचे पोलिसांना समजले असता पोलिसांनी दोन्ही महिलांवर कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.