कीरकोळ कारणावरून पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

    कीरकोळ कारणावरून पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

    पिंपरी: वाहतूककोंडी असल्याने बस हळू चालवत असलेल्या पीएमपी बस चालकाला दोघांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी पावणेआठ वाजता खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली.

    संकेत परमेश्वर कांबळे (वय २४, रा.खराबवाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एलडब्ल्यू ७५५५) वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस चालक आहेत. ते भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते. बिरदवडी येथे वाहतूककोंडी असल्याने कांबळे त्यांच्या ताब्यातील पीएमपी बस हळूहळू चालवत होते. त्यावेळी पाठीमागून एका दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी दुचाकी बसला आडवी लावली. त्यानंतर कांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *