सायबर चोरट्यांनी पुण्यातील तिघांना घातला गंडा, तब्बल ७७ लाखांची फसवणुक

    पुणे: सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता सायबर चोरट्यांनी तीन जणांना गुंतवणुकीवर जादा नफा देण्याच्या आमिषाने ७७ लाख रुपयांना गंडा घातला आहे.

    याप्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    तक्रारदार तरुण मांजरी भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी ऑक्टोबर महिन्यात तरुणाच्या मोबाइलवर मॅसेज पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. तरुणाने पैसे गुंतविले. वेळोवेळी १३ लाख ७ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला तरुणाला चोरट्यांनी परतावा दिला. नंतर मात्र, परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौड तपास करत आहेत.

    अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी लोहगाव भागातील एका व्यावसायिकाची ४७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने कोंढवा भागातील एकाची १६ लाख ८४ हजार १९२ रुपयांची फसणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *