नावात देवी आणि कर्मात दैत्य, दोन सराईत महिला चोरट्या गजाआड, स्वारगेट पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    नावात देवी आणि कर्मात दैत्य, दोन सराईत महिला चोरट्या गजाआड, स्वारगेट पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडील सोन्या, चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी सापळा रचत चोरट्यांना अटक केलीय.

    दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत, दोन्ही चोरटे हातसफाई करायचे. मात्र, पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेत लंपास केलेला मुद्देमाल हस्तगत केलाय.

    पुण्यातील स्वारगेट भागात एसटी स्टॅण्डसह पीएमपीएलची स्थानकं आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांकडील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारायचे. एखादी माहीला प्रवासीच्या अंगावर दागिने दिसले की २ महिला चोर, तसेच त्यांचे इतर साथीदार प्रवाशांच्या आजूबाजूला फिरत असे.

    प्रवासी नेमकं कोणत्या बसमध्ये चढणार याची चोरटे आधी माहिती घेत असे. नंतर बसमध्ये चढताना चोरटे प्रवाशांच्या चारही बाजूनं घेराव घालायचे आणि हातसफाई करत दागिने लंपास करायचे. स्वारगेट पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून दागिने लंपास झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. त्यामुळे स्वारगेट पोलिसांच्या दामिनी पथकानं या ठिकाणी गस्त घालण्यास सुरूवात केली.

    पोलिसांना २ महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता, दोन्ही आरोपी महिला मुळच्या कर्नाटकच्या असून, पुण्यात चोरी करण्यास येत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यांनी चोरीची देखील कबुली दिली असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचे ६ तोळे दागिने जप्त करण्यात आलंय. त्यांनी आतापर्यंत स्वारगेट आणि कात्रज एस टी स्टँड भागात ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *