भंगाराच्या दुकानात स्फोट; तीन जण गंभीर जखमी, एक जण मृत्युमुखी

    भंगाराच्या दुकानात स्फोट; तीन जण गंभीर जखमी, एक जण मृत्युमुखी

    पुणे: बी टी कवडे रस्ता येथील सानिया स्क्रॅब सेंटर भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्यामुळे एक जण मृत्युमुखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर या स्फोटाचा आवाज ऐकू आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान बी टी कवडे रोड येथे मोठ्या आवाज होऊन स्फोट झाल्यामुळे नागरिक घाबरले. यावेळी या परिसरातील दुकानांमध्ये जुन्या फ्रिजमधील कॉम्प्रेसर काढताना गॅसची गळती होऊन स्फोट झाला.

    यामध्ये मेहबूब शेख (वय ५०) कामगाराचा मृत्यू झाला. तसेच दिलीप मिसाळ (वय ४०), किशोर साळवे,(वय४०) दोन कामगार आणि भंगाराच्या दुकानाचा मालक महमंद सय्यद( वय ५० ) हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. सर्वजण रामटेकडी परसरात राहणारे आहेत.

    बीटी कवडे रोड येथे अनेक वर्षांपासून सानिया स्क्रॅब सेंटर येथे भंगार गोळा करून विक्री करण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान भंगारातील वस्तूंचे विल्हेवाट लावून त्यातील महत्त्वाच्या वस्तूचे विभाजन करून विक्री करत असे. आजही चौघेजण गप्पा मारत दुपारी जुन्या फ्रिजमधून कॉम्प्रेसर काढण्याचे काम सुरू होते. अंदाज न आल्याने त्याचा स्फोट होऊन मेहबूब शेख यांचा मृत्यू झाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *