राँगसाईडने रिक्षा चालवण पडल महागात, रिक्षा प्रवाशाचा मृत्यु

    राँगसाईडने रिक्षा चालवण पडल महागात, रिक्षा प्रवाशाचा मृत्यु

    पुणे: दारुच्या नशेत राँग साईडने रिक्षा चालवून कॅबला धडक दिल्यानंतर रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात रिक्षा प्रवाशाचा मृत्यु झाला.

    धरमवीर राधेशाम सिंग (वय ३८, रा.श्रीनगर, वडगाव शेरी) असे मृत्यु पावलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याबबात कॅबचालक पराग सुनिल शर्मा (वय २८, रा. हॅप्पी इस्टेट, चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जॉन राजू स्वामी (वय ३१, रा. मुळीक कॉम्प्लेक्स, वडगाव शेरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

     

    हा प्रकार नगर -पुणे रोडवर आगाखान पॅलेस समोर रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन स्वामी याने दारु पिऊन त्याच्या नशेत प्रवाशांना घेऊन वडगाव शेरीहून आला होता. रॉंग साईडने भरधाव रिक्षा चालवली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॅबच्या डाव्या बाजूस धडक दिली. त्यानंतर रिक्षा ही कॅबच्या मागे जाऊन पलटी झाली. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे समोरील डाव्या बाजूचे बंप्पर, हेडलाईट चेंबून तुटून नुकसान झाले. त्याचवेळी रिक्षा पलटी झाल्याने आतील प्रवासी धरमवीर राधेशाम सिंग यांचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक लमखेडे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *