३१ डिसेंबरला पुण्यात कशी असेल सुरक्षा व्यवस्था? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

    ३१ डिसेंबरला पुण्यात कशी असेल सुरक्षा व्यवस्था? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

    पुणे: ख्रिसमसनंतर आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. त्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी रात्री पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करणार आहेत.

    त्यासाठी पुणे पोलिसांकडूनही चोख नियोजन करण्यात आलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

    अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात येणार असून शहरातील २३ ठिकाणी ड्रंक एंड ड्राइव मोहीम राबवण्यात येणार आहे.३१ डिसेंबर रोजी तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच ७०० वाहतूक पोलीस कर्मचाही तैनात असणार आहेत.

    दरवर्षी एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते. त्याठिकाणीही विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. पुण्यात एकूण ४० ठिकाणी अधिकृत पार्टी आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

    महत्त्वाचे म्हणजे पुण्यात पहाटे ५ पर्यंत मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यादरम्यान अल्पवयीनांना दारू न देण्याच्या सूचनाही पुणे पोलिसांकडून बार व रेस्टॉरंट मालकांना देण्यात आल्यात आहेत.

    या सगळ्या नियोजनाचे सीसीटीव्हीद्वारे लाइव मॉनिटरिंग होणार असून नियमांचं पालन ना करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *