पुण्याच्या मुंढव्याच्या हायस्पिरीट पबचा कारनामा, पार्टीत Condom आणि ORS चे वाटप

    पुण्याच्या मुंढव्याच्या हायस्पिरीट पबचा कारनामा, पार्टीत Condom आणि ORS चे वाटप

    पुणे: नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीत चक्क कंडोम आणि ओआरएच्या पाकिटाचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील हायस्पिरीट या पबकडून ही पाकिट वाटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पार्टीत पाकीट वाटण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

    कंडोम आणि ओआरएसची पाकिट वाटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पबने या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पाकिट वाटल्याचा दावा पबकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पार्टीला जाणाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कंडोम वाटणे हा गुन्हा नाही असा दावा पबकडून करण्यात आला आहे.

    नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीला जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना, ऑफर देत असतात. पुण्यातील या क्लबने देखील काही तर वेगळे करण्यााठ आणि जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी या पाकिटाचे वाटप करण्यात आले आहे. लोकांना सुरक्षेसाठी या वस्तू आम्ही वाटत आहे. यामध्ये सॅनटरी पॅड, कंडोम आणि ओरआरएस देण्यात आले आहे, असा दावा पबकडून करण्यात आला आहे.

    सध्या या प्रकरणानंतर पबची जोरदार चर्चा आहे. सध्या पोलिसांनी पार्टीला येणाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, कंडोम वाटणे हा कोणता गुन्हा नाही. कायद्यामध्ये देखील अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे पोलिस देखील या पार्टीवर नजर ठेवून आहे.

    नव्या वर्षाचा स्वागत करण्यासाठी पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अनेक तरुणाई एकत्र येत असते. त्याचबरोबर हॉटेल पब अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होत आहेत.त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना कुठेही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चौक पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर पब आणि हॉटेल पहाटेपर्यंत सुरू राहणार असले तरी त्या ठिकाणी कोणताही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही याची काळजी ह़ॉटेल चालकांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *