पादचारी तरुणाला फरफटत नेणारे मोबाइल चोरटे अटकेत; हडपसर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    पादचारी तरुणाला फरफटत नेणारे मोबाइल चोरटे अटकेत; हडपसर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    हडपसर (पुणे): पादचारी तरुणाला फरफटत नेणाऱ्या मोबाइल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी, तसेच चोरलेला मोबाइल संच असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    गुन्हा केल्यानंतर पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी १०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

    मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (वय २१), कृष्णा संजय वाणी (वय २०, दोघे रा. धायरकर वस्ती, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरातून पादचारी तरुण रात्री निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेले चोरटे पवार आणि वाणी यांनी त्याच्या हातील मोबाइल संच चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. पादचारी तरुणाने दुचाकीवरील चोरट्यांना विरोध केला. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतर फरफटत नेले.

    या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला. तरुणाने आरडओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. तरुणाने याबाबत हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड यांनी या भागातील १०० हून जास्त ठिकाणचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तपास करुन चोरट्यांचा माग काढला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *