कोयता गँगवर मोठी कारवाई, गँगच्या मुख्य पोलिसांच्या ताब्यात

    कोयता गँगवर मोठी कारवाई, गँगच्या मुख्य पोलिसांच्या ताब्यात

    बीड: पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. याचदरम्यान, पोलिसांनी कोयता गँगवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईनंतर कोयता गँगचं बीड कनेक्शन समोर आलं आहे.

    पुण्यातील कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या पोलिसांच्या कारवाईत कोयता गँगचे बीड कनेक्शन समोर आलं आहे. या गॅंगचा मुख्य आरोपी गोरख सातपुते याला त्याच्या साथीदारासह बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. बीडच्या गेवराई शहरातील म्हाडा कॉलनी भागात असलेल्या एका रिक्षामध्ये, दोघा जणांकडे तलवार आणि कोयता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला त्या ठिकाणी सापळा लावत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    पोलिसांचं हे पथक त्या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पकडले असता यामध्ये गोरख सातपुते, तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे हे दोघे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून कोयता, तलवार, चाकू आणि रिक्षा असा मुद्देमाल आढळून आला आहे. तर या दोघांवरही गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोयता गँगने पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकाने आणि वाहने फोडली होती. काही नागरिकांवर हल्ला चढवण्यात आला आहे. यातील एक गुन्हेगाराला लोकांनी पकडून चोप दिला होता. त्यानंतर या गुन्हेगाराला पोलिसांचं स्वाधीन केलं होतं. पुण्यातील वाढत्या कोयत्या गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पुणेकर चिंता व्यक्त करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *