पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात

    पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात

    पुणे: पुण्यातील मगरपट्टा परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका नशेखोर युवकानं भररस्त्यात मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शनिवारी (दि.११ जानेवारी) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाण केल्यानंतर स्थानिकांनी हस्तक्षेप करत सदर नशेखोर तरुणाला थांबवलं. त्यानंतर पोलिसांची सदर तरुणाला ताब्यात घेतलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण नशेत होता. मगरपट्टा येथे रस्त्यावर हुल्लडबाजी करत असताना या ठिकाणी कर्तव्य बजवात असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला हटकले. यावेळी राग अनावर होऊन आरोपीने थेट पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना मारहाण केली. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले.

    घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि हडपसर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. यानंतर त्यांनी नशेखोर आरोपीला ताब्यात घेतलं. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.

    आरोपीने सदर मारहाण का केली? याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान सोशल मीडियावर मात्र याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *