आळंदीतील सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद होणार का? ग्रामस्थांचा एकमताने ठराव मंजूर

    आळंदीतील सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद होणार का? ग्रामस्थांचा एकमताने ठराव मंजूर

    आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये अध्यात्मिक शिक्षणाबरोबर, शैक्षणिक शिक्षण ही खासगी वारकरी शिक्षण देण्यात येते. या संस्थांमध्ये कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २०० विद्यार्थी असतात. विशेषतः मुले आणि मुली काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळे असतात.

    त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलांचे आर्थिक शोषणाबरोबर लैंगिक शोषणाचे ही प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखानी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या असा ठराव मंजूर करून घेतला आहे.

    मागील काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे. या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे. तर काही जण शिक्षा भोगत आहेत. परंतु अशा प्रकारावर आळा बसेल असे आळंदीकरांना वाटत होते. परंतु अशा घटना वारंवार घडतच आहेत. काही प्रकार उघडीस येतात. काही प्रकार उघडीस येत नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे नाव खराब होत आहे.

    अशा घटनांचा तीव्र निषेध तसेच आळंदीकरांचा तीव्र उद्रेक पाहता समस्त आळंदीकर ग्रामस्थांची ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एक मुखानी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या असा ठराव मंजूर करून घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१०) हजेरी मारुती मंदिरात पुढील नियोजनासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक व याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *