हडपसर परिसरात अफिम बोंड्यांचा चुरा जप्त; ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

    हडपसर परिसरात अफिम बोंड्यांचा चुरा जप्त; ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

    हडपसर: पुण्यातील सय्यदनगर, हडपसर परिसरातील चिंतामणीनगर येथे पोलीसांनी छापा टाकत ८३ हजार रूपयांचा अफिम बोंड्यांचा चुरा (पॉपीस्ट्रा) जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय-३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीकडून अॅक्टीवा दुचाकीवर अफिमचा चुरा विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रमोद कोकणे व राहुल शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तत्काळ सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. युनिट दोनच्या अधिकारी व अमंलदारांनी काळेपडळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करून सुमेरलाल चौधरी याला ताब्यात घेतले.

    त्याच्याकडून ६१५ ग्रॅम अफिम बोंड्यांचा चुरा, अॅक्टीवा दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लटपटे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *