पुण्यातील व्यावसायिकांना भोवला जुगाराचा नाद; सिंहगड रोडवरील लॉजमध्ये पोलिसांची धडक कारवाई

    पुण्यातील व्यावसायिकांना भोवला जुगाराचा नाद; सिंहगड रोडवरील लॉजमध्ये पोलिसांची धडक कारवाई

    पुणे: धानोरी, शिवणे, कोंढवा, कोथरूड, वारजे माळवाडी येथील व्यावसायिक सिंहगड रोडवरील एका लॉजमध्ये एकत्र येऊन तीन पत्ती (तिरट) हा जुगार खेळत होते. सिंहगड रोड पोलिसांनी लॉजवर छापा टाकून जुगार खेळणार्‍या ६ जणांवर कारवाई केली.

    त्यांच्याकडून ७३ हजार २१० रुपयांची रोकड व जुगारीचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई ५ जानेवारी रोजी रात्री करण्यात आली.

    रवींद्र गुंदिया राठोड (वय ४०, रा. श्रीरंग एंपायर, धानोरी), हनुमंत मानसिंग राठोड (वय ४०, रा. वेस्ट कोस्ट , शिवणे), रामू दासू चव्हाण (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आंबु भद्रु राठोड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड), सत्यम खिमया राठोड (वय ३८, रा. सुसरुत रेसिडेन्सी, नर्‍हे), मोहन हरी चव्हाण (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना त्या दिवशी अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार तारू, मगर, पोलीस अंमलदार पाटील, विनायक मोहिते हे ५ जानेवारी रोजी रात्री हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करत संतोष हॉलसमोर आले. तेव्हा त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पूना गेट लॉज येथील पाचव्या मजल्यावरील रूममध्ये काही जण जुगार खेळत आहेत. या बातमीनुसार पोलीस रात्री दहा वाजता पूना गेट लॉजवर पोहोचले. त्यांनी पाचव्या मजल्यावरील या खोलीमध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे सहा जण तीन पत्ती नावाचा तिरट पत्त्यांचा पैसे ठेवून जुगार खेळत होते.

    रवींद्र राठोड (२७,९००रुपये), हनुमंत राठोड (१४०० रुपये), रामू चव्हाण (८६०० रुपये), आंबू राठोड (२९,५०० रुपये), सत्यम राठोड (१००० रुपये), मोहन चव्हाण (४८०० रुपये) असे एकूण ७३ हजार २१० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *