भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

पुणे: मध्यभागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यासह उपरस्ते वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होते. गर्दीच्या नियोजन करण्यासाठी गरज भासल्यास दुपारी तीननंतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

वाहतुकीस बंद राहणारे रस्ते पुढीलप्रमाणे-

लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक) , शिवाजी रस्ता (स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक), बाजीराव रस्ता- पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक, टिळक रस्ता ( मराठा चेंबर ते हिराबाग चाैक), सिंहगड गॅरेज, घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक, दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक (जोशी आळी), हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता वाहतुकीस बंद, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चाैकी, कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर भाग), जेधे प्रासाद रस्ता ते शास्त्री रस्ता ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक

दुतर्फा वाहने लावण्यास मनाई:

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्त्यावरील शनिपार चौक ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गांवर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहने लावण्याची ठिकाणे:

कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे महाविद्यालय, शनिवार वाडा परिसरातील एच. व्ही देसाई महाविद्यालय, पुलाची वाडी नदीपात्रातील रस्ता, पूरम चौक ते हाॅटेल विश्व चौक (रस्त्याच्या डाव्या बाजूला), सोमवार पेठेतील दारुवाला पूल ते खडीचे मैदान ,गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक (कालव्यालगत, वीर पासलकर पथ), टिळक पूल ते भिडे पूल नदीपात्रातील रस्ता, बालभवनसमोर (सारसबाग ते बजाज पुतळा, सणस पुतळा चौक उजवी बाजू), शिवाजीराव आढाव वाहनतळ (नारायण पेठ, हमाल वाडा)

वाहनचालकांच्या माहितीसाठी:

गणेश विसर्जनापर्यंत शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरुन जाणाऱ्या चारचाकी वाहनांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *