चक्क पतीने केला पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, पती जेरबंद, चंदननगर पोलिसांची कामगिरी
- क्राईम
- September 1, 2022
- No Comment
वानवडी: दागिने बँकेत गहाण ठेवून त्यावर घेतलेल्या कर्जाबाबत विचारणा केली म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला.
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पती संदीप शिवाजीराव घुले (वय 51, रा. वानवडी) याला अटक केली आहे. याबाबत 47 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी घुलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 30) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. संदीपचा बिअर शॉपीचा व्यवसाय आहे.
पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्याने बँकेचे कर्ज घेतले होते. दरम्यान, पत्नीने याबाबत पतीकडे विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मंगळवारी बेडरूममध्ये त्यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.