पुणे- सोलापूर महामार्गावर मोठी कारवाई; 3 कोटी 60 लाख रुपये लुटणारे चोर गजाआड
- क्राईम
- September 2, 2022
- No Comment
पुणे: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापुरजवळ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटुन धूम ठोकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB)ला यश आलं आहे.
ग्रामीण पोलिसचे अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली. 26 ऑगस्ट रोजी पहाटे पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक येथे ही घटना घडली होती. स्कार्पिओ गाडीला अडवून त्यावर गोळीबार करत गाडीतील दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे असलेली साडेतीन कोटी रोख रक्कम लुटली.
सुरुवातीला एवढी मोठी ही रक्कम हवालाची असल्याची चर्चा होती मात्र ही रक्कम अंगडीयाची असल्याचे समोर आले आहे.या धक्कादायक घटनेनंतर सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. अभिनव देशमुख यांनी तपासासाठी पथके तैनात केली होती.त्यानुसार रात्रंदिवस याचा तपास सुरू होता.अखेर काही चोरांना अटक केली आणि त्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी हे सोलापुर जिल्ह्यातील कुर्डु आणि इंदापुर तालुक्यातील आहेत. या सगळ्यात 10 चोरांचा समावेश होता. रक्कम लुटल्यानंतर यातील काही चोर गुजरातला फिरायला गेले होते मात्र त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आलं आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घरातून रोकड आणि 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका चोराला गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती . गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय मुश्तफा उर्फ बोना शकील अन्सारी, 29 वर्षीय जुनैद रिझवान सैफ आणि 31 वर्षीय हैदर कल्लू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती. रोख रक्कम आणि दागिने चोरणाऱ्या अन्सारी याला गुन्हे शाखेने अटक केली होती तर अन्य दोन आरोपींना पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक होती.
या सगळ्या कारवाईत 3 कोटी 60 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. यात 10 आरोपींचा समावेश आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बाकी आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांनाही लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.