पुणे: गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत होतोय मोठा बदल, असे असतिल नवे मार्ग
- पुणे
- September 2, 2022
- No Comment
पुणे: पुणे शहरात (pune Ganeshotsav) तब्बल 3600 सार्वजनिक मंडळांमध्ये लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होत असून, प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात आकर्षणाचा केंद्र बिंदू असतो, ढोल-ताशांच्या गजरात निघणारी गाणयाराची मिरवणूक असो वा.. जिवंत देखावे आणि सामाजिक उपक्रम असे अनेक विषय गणेश उत्सवादरम्यान पाहायला मिळतात.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त आजपासून पुणे (Pune) शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरातील मुख्य रस्त्यांवर एकेरी पादचारी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
8 सप्टेंबरपर्यंत गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना (devotee) एकेरी पादचारी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. दुपारी तीन ते रात्री गर्दी संपेपर्यंत येणाऱ्या भाविकांना एकेरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पुणे वाहतूक पोलिसांकडून (pune Ganeshotsav) शहरातील मुख्य रस्त्यांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील आठ दिवस वाहतुकीचे नियोजन असणार आहे.
या रस्त्यांपैकी काही रस्ते जाताना तर काही रस्ते येताना वापरावे लागणार आहेत. गणेशोत्सव काळात भाविकांना काही अडचण येऊ नये यासाठी पादचारी एकेरी मार्ग, पादचारी दुहेरी मार्ग असे रस्त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
गर्दीच्या नियोजनासाठी रस्त्यांमध्ये बदल…
यामध्ये जिजामाता चौक ते रामेश्वर चौक आणि बेलबाग चौक ते बाबू गेनू गणेश मंडळ हा मार्ग फक्त जाण्यासाठी तर बेलबाग चौक ते गणपती चौक आणि
तुळशीबाग गणपती ते जिलब्या मारुती चौक हा मार्ग येण्यासाठी वापरावा लागणार आहे. हे सर्व रस्ते मुख्य रस्ता शिवाजी मार्गाला जोडले गेलेले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि मानाच्या गणपतीसह इतर गणपती मंडळाच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांसाठी (pune Ganeshotsav) पोलिसांकडून हे बदल करण्यात आले आहेत.