शेअर्स विक्री करून 17 लाखांना घातला गंडा, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 2, 2022
- No Comment
पुणे: आर्थिक फायदा करून देण्याचे भासवुन, ई-मेल खाते व त्याचा पासवर्ड घेऊन डी मॅट खात्यावरील 17 लाख रुपयांचे शेअर्स परस्पर विक्री करून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कर्वेनगर येथील 42 वर्षीय व्यक्तीने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक माहेश्वरी जैन नावाच्या व्यक्ती विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1 ते 23 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेअर मार्केटध्ये ट्रेडिंग करतात. फिर्यादी व आरोपीची ओळख झाल्यानंतर त्याने फोनद्वारे त्यांचा विश्वास संपादन करून शेअर्स मार्केटमधून आर्थिक फायदा करून देण्याचे अमिष दाखवले. फिर्यादींना तो डी मॅट अकाउंट हॅण्डलर असल्याचे वाटल्यामुळे त्यांनी विश्वासाने ई-मेल खाते व त्याचा पासवर्ड, तसेच डी मॅट खात्याची गोपनीय माहिती हवाली केली.
आरोपीने फिर्यादींच्या डी मॅट खात्यावरील शेअरखान अकाउंट हॅण्डल करून परस्पर 17 लाख रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चौकशीअंती वारजे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास गुन्हे निरीक्षक बागवे करीत आहेत.