ऑटो रिक्षा व प्लेटा चोरणा-या सराईत गुन्हेगार गजाआड, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची उल्लेखनीय कामगिरी

ऑटो रिक्षा व प्लेटा चोरणा-या सराईत गुन्हेगार गजाआड, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची उल्लेखनीय कामगिरी

पुणे: पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहनचोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याने मा. वरिष्ठांनी वाहनचोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित होते. त्या अनुषंगाने दि. ३०/०८/२०२२ रोजी मा. पोलीस निरीक्षक
राजेन्द्र कदम सो. यांचे आदेशानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेने तपास सुरु केला.

१) राकेश परशुराम वाकडे, वय १९ वर्षे, रा. कैलास मित्र मंडळ, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे, २) यश कालिदास जगताप, वय १८ वर्षे, अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी प्रतिबंधक चे अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोहवा ५४५ बाळु गायकवाड व पोना २८८ धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोथरुड पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं १९८/२०२२ भादंवि कलम ३७९ या दाखल गुन्ह्यातील रिक्षा चोरी करणारे दोन इसम हे म्हातोबा नगरकडे जाणा-या रोडवर, शिक्षकनगर, कोथरुड, पुणे येथे संशयितरित्या थांबले आहेत. खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदरची बातमी प्रभारी अधिकारी मा.पोनि राजेंद्र कदम सो यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीबाबत मा. वरिष्ठांना माहिती देवुन मा वरिष्ठांच्या परवानगीने कारवाई करण्याचे मौखिक आदेश दिले होते.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास करीत सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता वरील नमुद दोन्ही इसम हे सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची चाैकशी केली असता आरोपी क्रं. १ राकेश परशुराम वाकडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी व माझा मित्र नामे यश जगताप असे आम्ही दोघांनी कोथरुड येथुन रिक्षा चोरली व सदर चोरीच्या रिक्षाचा हिंजवडी येथुन प्लेटा चोरी करतेवेळी वापर केला असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस स्टेशन येथे प्लेटा चोरीबाबत गुन्हा रजि नं ७९७/२०२२ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी क्रं १ राकेश परशुराम वाकडे हा पाहिजे आरोपी असुन सदर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकरीता कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त साो, अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त सो, रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ मा. श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र कदम, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, पोलीस नाईक धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे, पोलीस अंमलदार श्रीकांत दगडे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *