पुणे: गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड, ८४ मोबाईल फोन जप्त
- क्राईम
- September 3, 2022
- No Comment
पुणे: सध्या राज्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरा हो असुन या सणा निमीत्त खरेदी व दर्शनाकरीता लोक मोठया प्रमाणात गर्दी करीत असतात, याच गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी व पाकिट चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडण्याची शक्यता असल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडुन मिळालेल्या सुचना व मार्गदर्शना नुसार सिंहगड रोड पो.स्टे गुन्हा रजि नं.
३७८/२०२२ भा.द.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास करीत असताना, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार नमुद गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने पो.स्टे. हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार ” देवा चव्हाण”यांना त्यांचे खास बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, “मोबाईल चोरी करणारे तीन इसम फनटाईम थेअटरच्या मागील रोडवर थांबलेले असुन त्याचेकडे दोन काळ्या रंगाच्या बॅग असून त्यामध्ये चोरी केले मोबाईल आहेत” अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने ती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांनी खात्री करुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्याने बातमीप्रमाणे खात्री केली असता, प्राप्त बातमीचे ठिकाणी तीन संशईत इसम उभे असल्याचे व त्याचेकडे दोन बॅगा व त्यांचे हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना सापळा रचुन जागीच दि. ०१/०९/२०२२ रोजी १९/५० वा ताब्यात घेत असताना त्याचे सोबत असणारा एक इसम पळुन जावु लागल्याने त्याला देखील लागलीच थोड्या अंतरावर पाठलाग करुन पकडण्यात आले.
नमुद संशयीत इसमांकडे त्याचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) शरथ मंजुनाथ, वय २१ वर्षे, रा. हनुमंतनगर हौसमाने मारीअम्मा मंदीराजवळ, भद्रावती शिमोगा कर्नाटक, राज्य सध्या पुणे फिरस्ता २) केशवा लिंगराजु, वय २४ वर्षे, रा. पहीला क्रॉस संते मंदीना, भोवी कॉलनी, भद्रावती शिमोगा, राज्य कर्नाटक, सध्या पुणे फिरस्ता ३) नवीन हनुमानथाप्पा, वय १९ वर्षे, रा. पहीला क्रॉस उजव्या बाजुस डुडुकलांबा मंदीराजवळ भोवी कॉलनी हौसमाने भद्रावती शिमोगा राज्य कर्नाटक सध्या पुणे फिरस्ता असे असल्याचे सांगितले, त्याचेकडील बॅगांची पाहणी केली असता १) शरथ मंजुनाथ याचे ताब्यातील बॅगमध्ये अॅपल, विवो,ओपो, सॅमसंग रेडमी, रिअलमी कंपनीचे एकुण ४२ मोबाईल हँडसेट मिळुन आले २) केशवा लिंगराजु याचे ताब्यातील बॅग मध्ये अॅपल, विवो ओपो, सॅमसंग, रेडमी, रिअलमी कंपनीचे एकुण ४१ मोबाईल हँडसेट मिळुन आले ३) नवीन नुमानथाप्पा याचे पॅन्टच्या खिशामध्ये १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसमांचे ताब्यातील मोबाईल फोन संदर्भात याचे कडे पावतीची व मुळ मालकाची विचारणा करता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदर इसमांनी सदरचे मोबाईल हे नक्कीच कोठुन तरी चोरुन आणले आहेत याची खात्री झाल्याने अनु.क्र.३. नवीन नुमानथाप्पा याचे कडे मिळुन आलेल्या मोबाईल बाबत अधिक तपास करता, त्याने व त्याचे वरिल साथिदार यांनी मिळुन मार्केटयार्ड भाजी मंडई, स्वारगेट बस स्टॅण्ड, बालाजीनगर, कात्रज भाजी मार्केट, अभिरुची परिसर, वडगाव भाजी मार्केट व पुणे शहराच्या इतर गर्दीच्या ठिकाणावरुन मागील १० दिवसांपासुन चोरी केली असल्याचे सांगितले आहे. सदरबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अभिलेख पाहता त्याबाबत सिंहगड रोड पो.स्टे. गुन्हा रजि नं. ३७८/२०२२ भा.द.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा नोंद असले बाबत माहीती प्राप्त झाल्याने नमुद गुन्ह्यात आरोपीतांना दि. ०१/०९/२०२२ रोजी २३/१० वा. अटक करुन त्यांची मा. न्यायालयातुन पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात
आली असुन, त्यांच्या ताब्यात मिळुन आलेले मोबाईल कोठुन केव्हा चोरले आहेत व सदर मोबाईलचे मुळ मालक कोण याबाबत पुढील तपास श्री. सचिन निकम, सहा पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड, पोलीस स्टेशन, पुणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी राजेंद्र डहाळे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेक्षिक विभाग. पुणे पोर्णिमा गायकवाड पोलीस उप-आयुक्त सो परि ३ पुणे सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, सचिन निकम, सहा. पोलीस निरीक्षक आबा उत्तेकर, सहा. पोलीस फौजदार, पो.हवा. संजय शिंदे, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, अमित बोडरे, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोंडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, दिपक शेंडे, सचिन गाढवे, नलिन येरुणकर यांनी केली आहे.