एक विडिओ कॉल होत्याच नव्हत करीन, आला तरी उचलु नका…
- क्राईम
- September 4, 2022
- No Comment
पुणे: पद,सन्मान,प्रतिष्ठेसाठी कर्जबाजारी झालेले पाहिले.आपल्या समाजात वावरताना प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने स्वताची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडताना दिसतात.महाराष्ट्र हा ईतर राज्यांसाठी दुबई आहे.प्रत्येक परप्रांतीय नागरिकाचे स्वप्न हे महाराष्ट्रात स्थायिक कसे होईल असे असते व त्यासाठी धडपडही सुरु असते.शक्यतो ईतर राज्यातून आपले फेसबुक वरील प्रोफाईल पाहुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते.फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताच मॅसेंजर वरुन मोबाईल नंबर मागवून थोडीशी चॅटिंग करत आपल्यातील पुरुष जागा करत विषय विडिओ कॉल वर येतो,समोरिल महिला नग्न स्वरुपात येते, स्क्रीन रेकॉर्ड असल्याने काही क्षणातच विडिओ येतो.खरा खेळ सुरु होतो.पहिली पैशाची मागणी होते आणि देउनही होतच राहते.टाळाटाळ करायचा प्रयत्न केल्या तो विडिओ तुमच्या परिचयातील लोकांपर्यंत काही क्षणातच पोहचतो.आजवर कमावलेली ईज्जत काही क्षणातच जाऊ शकते म्हणून ओळखी व्यतिरिक्त कोणाच्या कसल्याच संपर्कात येऊ नका.
काय कराल-अनावधानाने असे काही झालेच खंबीर रहा,स्थानिक सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तात्काळ जाउन त्या व्यक्तीविरोधात निसंकोच तक्रार करा.पोलीस तक्रारदाराचे नाव हे गोपनीय ठेवतात.