कमी किंमतीत घर खरेदीचे आमिष दाखवून,२५ लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 5, 2022
- No Comment
पिंपरी: कमी किंमतीत घर खरेदी करून देतो, असे आमिष दाखवून तिघांनी मिळून एका महिलेला 25 लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 3 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत पिंपळे निलख आणि पिंपळे सौदागर येथे घडला.
संतोष कोंडिबा शिंदे (43, रा. रहाटणी), दिनेश दत्तात्रय पाटील (57, रा. पिंपळे सौदागर), संदीप परांजपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने शुक्रवारी (दि. 2) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना कमी किमतीत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.