पुणे ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, अवघ्या चार तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध
- क्राईम
- September 5, 2022
- No Comment
लोणावळा: दोन बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन अवघ्या चार तासांमध्ये ताब्यात घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष जाधव, रा. क्रांतीनगर, कुसगाव, यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली की, शनिवारी 3 सप्टेंबरला रात्री 9:00 वा. च्या सुमारास त्यांच्या दोन शाळकरी मुली ह्या राहत्या घरातून सकाळी 7.30 वा कन्या विद्यालय, भांगरवाडी, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. परंतु दुपारी दोन वाजेपर्यंत त्या दोघी घरी आल्या नाहीत त्यामुळे फिर्यादी यांनी शाळेत चौकशी केली असता त्या दोघी शाळेत आल्याच नसल्याचे कळले.
दोन्ही मुलींचा आसपासच्या परिसरात शोध घेतला परंतु त्यांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे फिर्यादींनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना रात्री 9 वा. च्या सुमारास कळविले. माने यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळविली. त्यांनी ती माहिती डॉक्टर अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, नितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा विभागातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून तात्काळ रवाना करण्यात आल्या. तपासा दरम्यान माने यांना आज 3 सप्टेंबरला संध्याकाळी 5:15 वाजता च्या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन येथे या मुली दिसल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील टीम यांना उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी रवाना केले.
माने यांनी अधिक तपास केल्यानंतर कळाले की, त्या मुली ह्या पनवेल- नांदेड या रेल्वे गाडीने नांदेड कडे जात आहेत. याबाबत नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांना भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग व सहाय्य्क पोलीस निरीक्षक माने यांनी फोन द्वारे माहिती त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज 4 सप्टेंबर ला रात्री 12.30 वा च्या सुमारास त्यांचे पोलीस अधिकारी साबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक चौनसिमग गुसिंगे, पोलीस नाईक पांडुरंग बोचरे, राजु थोरात सर्व आनंदनगर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांना उस्मानाबाद रेल्वे स्टेशनला तात्काळ रवाना केले.
त्यांनी त्याप्रमाणे ही रेल्वे गाडी उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे येताच दोन्ही मुलींचा शोध घेतला व रात्री 12.55 वा सुखरूप ताब्यात घेतल्या. याबाबत निलेश माने यांनी दोन्ही मुली सुखरूप असल्याचे खात्री केले. दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस हवालदार जय पवार व इतर यांना तात्काळ रेल्वेच्या मागोमाग रवाना केले. त्यांनी आनंदनगर पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथून आज सकाळी 7 वा दरम्यान दोन्ही मुलींना ताब्यात घेतले व त्या सुखरूप होत्या.
ही कामगिरी कुठलेही सुगावा नसताना तसेच मुलींचा ठाव ठिकाण माहित नसताना डॉक्टर अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, नितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, भाऊसाहेब ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अतिरिक्त कार्यभार लोणावळा विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार कामशेत पोलीस ठाणे, पो.स.ई श्री अडोदे, वडगाव मावळ पोलीस ठाणे, चौंनसिंग गुसिंगे, सहायक पोलीस निरीक्षक, आनंदनगर पोलीस ठाणे, उस्मानाबाद, पोलीस नाईक पांडुरंग बोचरे पोलीस नाईक राजु थोरात, सहाय्यक उप पोलीस निरीक्षक युवराज बनसोडे, पोलीस नाईक भुषण कदम, पोलीस नाईक प्रणय उकिर्डे, पोलीस नाईक शरद जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेलार, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस नाईक पांडुरंग बोचरे पोलीस नाईक राजू थोरात आनंदनगर पोलीस ठाणे यांनी अथक परिश्रम करून अवघ्या चार तासांमध्ये केली आहे.