वाहतूककोंडी मुळे पीएमपीएल चालकाला बेदम मारहाण, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

वाहतूककोंडी मुळे पीएमपीएल चालकाला बेदम मारहाण, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे: वाहतूककोंडी झाल्यामुळे रस्त्यात पीएमपीएल बस बंद करून थांबलेल्या चालकाने मोटारीला जागा न दिल्याच्या रागातून एकाच कुटूंबातील चौघांनी चालकाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.

ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास शंकरशेठ रस्ता परिसरातील सेव्हन लव्हज चौकात घडली.

याप्रकरणी निखील राजेश कटके (वय 26), कविता राजेश कटके (वय 44) , नितीन जयपाल कटके (वय 47, सर्व रा. श्रीकृष्ण सोसायटी गुलटेकडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीएमपीएल चालक लक्ष्मण धुमाळ (वय 41, रा. कात्रज) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लक्ष्मण हे पीएमपीएल बसचे चालक असून शुक्रवारी बस घेउन शंकरशेठ रस्त्याने निघाले होते. सेव्हन लव्हज चौकात वाहतूककोंडी असल्याने त्यांनी बस थांबवली. त्यावेळी मोटारीतून आलेल्या कटके कुटूंबियाने लक्ष्मण यांना शिवीगाळ केली. आज तुझ्या गाडीची काच फोडतो, असे म्हणत चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. पीएमपीएल बस चालकाने वाहनचालकाला रस्ता न दिल्याच्या रागातून संबंधित कुटूंबियाने बसचालकाला बेदम मारहाण केली.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक करत आहेत.

Related post

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३९ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस…

पुणे: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३९ (१)(२)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश…
हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

पुणे हडपसर :हडपसरमधील महत्त्वपूर्ण कळेपडळ अंडरपासवरील उंचीबंदी अचानक कोसळल्याने एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली, आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. ही…
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. १५ लाख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *