गांजा बाळगल्याप्रकरणी आरोपी महीला गजाआड, निगडी पोलीसांची कामगिरी
- क्राईम
- September 6, 2022
- No Comment
निगडी: विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 3) दुपारी पेरूची बाग ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओटा स्कीम निगडी येथील पेरूची बाग येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास एका घरात कारवाई केली या कारवाई मध्ये पोलिसांना दोन किलो 120 ग्रॅम वजनाचा 53 हजार रुपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजा आणि दोनशे रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त केला आहे.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.