फोन करून क्रेडिट कार्डची माहिती घेत दोन लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

फोन करून क्रेडिट कार्डची माहिती घेत दोन लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हिंजवडी: बँकेतून बोलत असल्याचे सांगून ईमेल अपडेट करण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची माहिती घेत दोन लाखांची फसवणूक केली. ही घटना 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन माध्यमातून घडली.

नागेश नरसिम्हा पुजारी (वय 49, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 3) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7074580746 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींना फोन करून त्यांनी कधीही ऑर्डर न केलेल्या क्रेडिट कार्डच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.ईमेल आयडी अपडेट करण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून क्रेडिट कार्ड क्रमांक घेत त्यांची एक लाख 99 हजार 955 रुपयांची फसवणूक केली.

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Related post

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३९ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस…

पुणे: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३९ (१)(२)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश…
हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

पुणे हडपसर :हडपसरमधील महत्त्वपूर्ण कळेपडळ अंडरपासवरील उंचीबंदी अचानक कोसळल्याने एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली, आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. ही…
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. १५ लाख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *