भाई असल्याचे सांगून लोखंडी कोयत्याने दहशत माजवणार्या टोळका जेरबंद
- क्राईम
- September 9, 2022
- No Comment
वाकड: भाई असल्याचे सांगून लोखंडी कोयत्याने दहशत माजवून हाताने मारहाण करणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अश्विन सिंग, (वय 17, रा. नढे नगर काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी 7 सप्टेंबरला फिर्याद दिली आहे
याप्रकरणी मन्या उर्फ प्रतीक घोडके, (वय 22 ,रा. काळेवाडी) व त्याच्याबरोबर त्याचे तीन अनोळखी मित्र. पूर्ण नाव पत्ते माहीत नाहीत.या आरोपींच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी घोडके याला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरला रात्री 9 ते 9:30 दरम्यान फिर्यादी व त्याचे मित्र कुणाल चौधरी, तेजस वराडे व अनुज गोड गप्पा मारत जीवन चौक काळेवाडी येथून पायी चालत जात होते.त्यावेळेस त्या ठिकाणी काही मुले दारू पिऊन मोठमोठ्याने शिव्या देत होती म्हणून फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिले. त्याचा राग येऊन आरोपी यांनी फिर्यादी या हाताने मारहाण करून आरोपी घोडके यांनी फिर्यादीच्या डोक्याच्या मागील भागावर कोयत्याने वार करून दुखापत केली.
‘मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई काळेवाडीमध्ये राहायचे असेल तर इज्जतीत राहायचे नाही तर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही’, असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोयता हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत माजवत होता.भांडण सोडविण्याकरिता फिर्यादी यांचे मित्र मध्यस्थी करण्यास आले असता मन्या घोडके व त्याच्या मित्रांनी फिर्यादीच्या तीन मित्रांना हाताने मारहाण केली.
आरोपींच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी घोडके याला अटक करण्यात आली आहे.