पुणे: श्रीमंत दगडुशेठ गणपतीची सागरसंगीत मिरवणुक

पुणे: श्रीमंत दगडुशेठ गणपतीची सागरसंगीत मिरवणुक

पुणे: पुण्याची शान असलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक यंदा निर्बंधमुक्त होत आहे. त्यामुळे पुण्यातील मुख्य लक्ष्मी रस्त्यावर नागरीकांचा जनसागर उसळला आहे. मानाच्या पाचही गणपतींचे शुक्रवारी दिमाखात विसर्जन झाले.तर ज्याची सर्व जण आतुरतेने वाट बघत असतात त्या श्रीमंत दगडुशेठ गणपतीची मिरवणुक शनिवारी सकाळी 7.35 च्या सुमारास सुरु झाली.

सकाळी 7.35 च्या सुमारास श्रीमंत दगडुशेठ गणपती बोलबाग चौकाकडे निघाल्यानंतर तेथे मोठा जनसागर उसळला होता. स्वानंद रथात विराजमान झालेल्या या गणपतीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाईसह आबालवृध्दांनी तेथे गर्दी केली होती. दरवर्षी त्याची मिरवणुका रात्री 11 ते 1 च्या दरम्यान सुरु झालेली पहायला मिळते मात्र यंदा ती सकाऴी 7.35 च्या सुमारास सुरु झाली. त्याच्या आधी अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊ रंगारी आणि बाबुगेनू मंडळाचे गणपती असतात.

यंदा होत असलेल्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे प्रत्येक गणपतीच्या पुढे तीन ते चार ढोल ताशांची पथके आहेत. त्याशिवाय मानाच्या गणपतींमध्येसुद्दा अंतर पडल्याचे पहायला मिळत होते.त्यामुळे यंदाची पुण्याची मिरवणुक लांबणार हे आता निश्चित झाले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुक यथासांग पार पडली

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ बेलबाग चौकात दाखल झाला. त्यामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते हिंजवडी आयटी पार्कपर्यंत आणि श्री कसबा गणपती मंदिरापासून ते पाताळेश्वर लेण्यांपर्यंतची चित्रे लावण्यात आली होती. पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात आली.याशिवाय देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील झाले. त्यापाठोपाठ स्व-रूपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते.त्यामध्ये ध्वज, टाळ यांसह मर्दानी खेळ व ढोल-ताशा पथकही सहभागी झाले होते. दरबार ब्रास बँड, प्रभात ब्रास बँड यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.त्यामागे केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यांचा समूह देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता.

बेलबाग चौकामध्ये सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी मुख्य श्री स्वानंदेश रथ दाखल झाला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व इतर पोलीस अधिका-यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची आरती करण्यात आली.त्यानंतर पुढे हा रथ मार्गस्थ झाला.

श्री स्वानंदेश रथ हा दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आला.रथावर 8 खांब साकारण्यात आले होते. संपूर्ण रथावर तब्बल 14 शार्दुलच्या मूर्ती साकारण्यात आल्या. तर, रथाच्या वरच्या बाजूला बसविण्यात आलेल्या 5 कळसांवर कीर्तिमुख देखील लावण्यात आले. हा रथ व श्रीं चे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासोबतच मोबाईलमध्ये देखील अनेकांनी छायाचित्र टिपले

पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील पारंपरिक वेशात मोठया संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी गणेशभक्तांनी श्रीं ची आरती व स्वागत देखील केले.टिळक चौकामध्ये सकाळी 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास मुख्य रथाचे आगमन होताच मोरया, मोरया… जय गणेश असा जयघोष झाला. त्यानंतर 11 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे ‘श्रीं’ चे विसर्जन झाले.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *