बांधकाम व्यावसायिकाची साडे सहा लाखांची फसवणूक,आरोपी विरोधात गुन्हा दाखल
- क्राईम
- September 12, 2022
- No Comment
पिंपळे गुरव: पैसे घेऊनही बांधकामाचे साडे सहा लाखांचे साहित्य न देता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना 25 नोव्हेंबर 2021 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.
अरुण श्रीपती पवार (वय 51, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सुरेश काकडे (वय 43, रा. लोणी काळभोर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 20 वर्षांपासून वैष्णवी कन्स्ट्रक्शन व माउली तारकेश्वर ट्रेडिंग कार्पोरेशन या नावाने बांधकाम व्यवसाय आहे. त्या व्यवसायासाठी लागणारे सिमेंट आणि स्टील या मटेरियल ऑर्डर फिर्यादी यांनी आरोपीला दिली.
आरोपीने सुरुवातीला मटेरियलची ऑर्डर प्रामाणिकपणे पूर्ण करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला मटेरियल खरेदी करण्यासाठी 13 लाख 58 हजार 500 रुपये दिले. त्यातील काही रकमेचे मटेरियल आरोपीने पोहोच केले. मात्र, उर्वरित सहा लाख 58 हजार 500 रुपयांचे मटेरियल पोहोच न करता तसेच पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केली.
पुढीव तपास सांगवी पोलीस तपास करीत