क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून देतो सांगत घातला एक लाखाला गंडा,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 12, 2022
- No Comment
तळेगाव: बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देतो म्हणत बँक खात्यातून थेट एक लाख 10 हजार रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार मस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
आनंद गहिनीनाथ लोंढे (वय 35, रा. मस्करनीस कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8273295126 या क्रमांकावरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोंढे यांना आरोपीने फोन केला. तो आरबीएल बँकेतून बोलत असून लोंढे यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून आली आहे, असे सांगत लोंढे यांच्या क्रेडिट कार्डशी संबंधित काही माहिती देखील आरोपीने सांगितले. त्यामुळे लोंढे यांना फोनवरील व्यक्ती बँकेतूनच बोलत असल्याचा विश्वास बसला. लोंढे यांनी आरोपीसोबत ओटीपी आणि सीव्हीव्ही नंबर शेअर केला. त्यानंतर लोंढे यांच्या खात्यातून एक लाख 10 हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.