आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स
- देश
- September 12, 2022
- No Comment
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया:
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी परिवहन विभागाच्या https://parivahan.gov.in/ या संकेस्थळावर भेट द्या.
संकेस्थळावर क्लिक केल्यानंतर होम पेज ओपन होईल, इथे ऑनलाईन सर्विस या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्विसवर क्लिक करावं लागेल.
त्यानंतर समोर एक नवं पेज ओपन होईल, ज्यात तुम्ही जिथे राहता ते राज्य सिलेक्ट करुन अप्लाय करावं लागेल.
राज्य निवडल्यानंतर एक नवं पेज ओपन होईल, तिथे अनेक पर्याय दिसतील. त्या पर्यायांपैकी ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याचा पर्याय निवडावा लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवं पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जमा करावी लागतील हे सांगितलं जाईल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी माहिती खाली दिलेल्या बॉक्समध्ये भरावी लागेल.
माहिती भरल्यानंतर मागितलेली कागदपत्र स्कॅन करुन अपलोड करावी लागतील.
कागदपत्र अपलोड केल्यानंतर स्कॅन फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
त्यानंतर नवं पेमेंट पेज ओपन होईल, जिथे आधीपासून ठरलेली रक्कम ३५०/- रुपये द्यावे लागतील. ही रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट पर्यायांचा वापर करावा लागेल.
सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर एक रिसिप्ट जनरेट होईल, ती डाउनलोड करुन आपल्या कडे सेव्ह करू शकता.