धक्कादायकः चक्क नातीने केला आजीचा खून
- क्राईम
- September 15, 2022
- No Comment
वारजे: वारजे भागात झालेल्या 70 वर्षीय महिलेचा खून तिच्या नातीने केला असल्याचं आता समोर आले आहे.
चोरी केल्याचा बनाव करून नातीनेच आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नात गौरी सुनिल डांगे (वय 24, रा. आकाश नगर वारजे) हिने आपली आजी सुलक्षणा सुभाष डांगे (वय 70, रा. आकाशनगर, वारजे) हिचा खून केल्याची बातमी समोर आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,नात गौरी सुनिल डांगे हीला घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते.त्यामुळेच तिने आजीला मारून तिचे सोने व पैसे मिळविले आणि नंतर चोरीचा बनाव करून ती कामाला निघून गेली.घरी आल्यानंतर तिनेच पोलिसांना फिर्याद दिली.मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता खूनाची कबुली दिली.