पुण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

    पुण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

    पुण्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पती तसेच सासरच्या जाचाला कंटाळून शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

    कोंढवा आणि विमानतळ परिसरात या घटना घडल्या असून, याप्रकरणी पती व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले

    घटना 1:

    पहिल्या घटनेत नयना प्रकाश माघाडे (वय २६, रा. विठ्ठल निवास, संतनगर, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे आहे. याप्रकरणी पती प्रकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नयना यांचे भाऊ जय खरात (वय २८, रा. निंबगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

     

    नयना यांचा प्रकाश याच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रकाशने नयना यांचा छळ सुरू केला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे न आणल्याने मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून नयना यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पुढिल तपास सहायक निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

    घटना 2:

    दुसरी घटना कोंढवा भागात घडली असून, पतीच्या छळामुळे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी राहुल माने (वय ३६, रा. कासट काॅलनी, साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    याप्रकरणी पोलिसांनी पती राहुल याच्यासह नातेवाईक महिलेवर गुन्हा दाखल केला. याबाबत अश्विनी यांच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    अ्श्विनीचा पती राहुल तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिला त्याने मारहाण केली होती. छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक निरीक्षक राकेश जाधव पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *