पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन
- पुणे
- September 10, 2022
- No Comment
पुणे: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे परंपरेनुसार विसर्जन झाले आहे. या दरम्यान पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पुण्याच्या मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं 4.15 मिनीटांनी तर मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन सायंकाळी 5.30 वाजता झालं. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन हे 7.22 मिनीटांनी झालं तर मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे विसर्जन रात्री 8.02 वाजता झाले.
मानाच्या गणपती विसर्जनाशिवाय इतर गणपतींचे विसर्जन होऊ शकत नाही. ही पुण्याची प्रथा आहे. ती कायम ठेवत तसेच यंदा निर्बंधमुक्त मिरवणूक असल्याने पुण्यात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.