चक्क तंटामुक्तीच्या अध्यक्षच तडीपार, पुणे ग्रामीण पोलिसांपुणे ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

    चक्क तंटामुक्तीच्या अध्यक्षच तडीपार, पुणे ग्रामीण पोलिसांपुणे ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

    पुणे: पुण्याच्या जुन्नर मधील तंटामुक्तीच्या अध्यक्षालाच तडीपार करण्यात आलं आहे. रोहन बेल्हेकर असं त्याचं नाव असून, त्याची बोरी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे.

    पण त्याला दहा दिवसांसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तडीपार केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील अनेक गुन्हेगारांना तडीपार करावं, असे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यात बोरी गावच्या रोहनचा समावेश होता.

    रोहनवर विनापरवाना शस्त्र बाळगणे, जमावबंदी आणि मारहाण असे तीन गुन्हे दाखल आहेत. तो तालुक्यातील गणेशोत्सवात काहीतरी विघ्न आणेल, अशी शंका पोलिसांना होती. म्हणून नारायणगाव पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला संमती मिळाली अन दहा दिवसांसाठी त्याला तडीपार करण्यात आलं. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना रोहनची वर्णी तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी कशी काय लागली? त्याची ही निवड कोणी केली? ग्रामसभेने एकमुखाने याला संमती कशी काय दिली? असे प्रश्न यानिमित्ताने उभे राहिलेले आहेत.

    रोहनची ही निवड गेल्या आठवड्यातच झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. पण जेव्हा तो अध्यक्ष झाला तेंव्हा त्याने सोशल मीडियावर फोटोसह ही माहिती शेअर केली अन त्यानंतर त्याला तडीपार करण्यात आलं. पण तो तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे हे पोलिसांना समजताच त्यांना ही धक्का बसला.

    सनी रमेश तलवार, अक्षय रमेश तलवार (दोघेही राहणार पेठ आळी, नारायणगाव ता. जुन्नर), अजय ऊर्फ सोन्या राठोड (राहणार चौदा नंबर, वडगाव कांदळी ता. जुन्नर), सुशिल ऊर्फ बाळा राजू शिंदे, कृष्णा प्रताप माने, सूरज बाळासाहेब चव्हाण , मोसिन फिरोज इनामदार, (सर्व राहणार इंदिरानगर नारायणगाव, ता. जुन्नर), आवेश आदम आतार, आकाश भाऊ गोफणे (दोघेही राहणार नानूपाटे नगर, नारायणगाव ता. जुन्नर), सलमान अब्दुल रहमान मलिक, साहिल रफिक मुलाणी (दोघेही राहणार पाटे-खैरे मळा, नारायणगाव, ता. जुन्नर), गुरमीत बलवीर सिंग (राहणार कोल्हेमळा नारायणगाव, ता. जुन्नर), रोहन अनिल बेल्हेकर (राहणार बेल्हेकरमळा, ता. जुन्नर), सुजित ऊर्फ गणपत संजय गाडेकर यांना तडीपार करण्यात आलं आहे.

    उत्सव शांततेत पार पडण्यासाठी तडीपार
    गणेशोत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गुन्हेगारी करणाऱ्यांना आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चौदा जणांना नऊ दिवसांसाठी जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. चौदाही जणांना त्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या आहे.

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *