लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करत महीलेची फसवणुक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करत महीलेची फसवणुक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी: लग्नाचे आमिष दाखवून एकाने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 13 फेब्रुवारी ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला.  याबाबत 6 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप केशव गित्ते (रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने फिर्यादींसोबत वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच फिर्यादीला दुसरे कोणासोबतही लग्न करू दिले नाही. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *