दोन अल्पवयीन मुलींना धमकी देत त्रास देणार्या रोड रोमिओ वर गुन्हा दाखल
- क्राईम
- September 7, 2022
- No Comment
निगडी: शाळेतून दोन अल्पवयीन मुली पायी घरी जात असताना एका तरुणाने त्यांना अडवून गाडी अंगावर घालण्याची धमकी देत त्यांना त्रास देणाऱ्या प्रयत्न केला. या रोड रोमिओ वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना भेळ चौक, निगडी येथे घडली. कुणाल विनायक गवारे (वय 27, रा. प्राधिकरण, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 15 वर्षीय मुलगी आणि तिची 15 वर्षीय मैत्रीण अशा दोघी शाळेतून घरी पायी चालत जात असताना आरोपीने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. वारंवार पाठलाग करून गाडीवर बस नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालीन, अशी धमकी देऊन मैत्री करण्याचा प्रयत्न करत फिर्यादी यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.